बाजार समिती विषयी

कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा

वरोरा कृषि उत्पन्न बाजार समितीची मध्यप्रांत व व-हाडचा शेती उत्पन्नाच्या बाजार अधिनियम 1935 नुसार कॉटन मार्केट कमीटी म्हणून प्रथमत: 01/10/1935 ला स्थापन झाली. त्यावेळी केवळ कॉटन मार्केट कमेटीकडे कापसाचे नियंत्रण करण्याबाबत कायदा होता.

त्यानंतर कालांतराने बदल होवून महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. राज्यातील राज्यकारभाराचे दृष्टीने कायदयाचे एकीकरण करण्यात येवून संपूर्ण राज्यासाठी मार्केट कायदा अधिनियम 1963 विधेयक रूपात प्रसिद्ध करण्यात आला. कायदेमंडळाच्या चाकोरीतून जावून त्याला कायदयाचे स्वरूप 5 मे 1964 रोजी आले. असे जरी असले तरी त्याची अंमलबजावणी झाली. तेव्हापासून महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदीविक्री (नियमन) अधिनियम 1963 व नियम 1967 अन्वये मा. संचालक, कृषि वाणीज्य व ग्रामीण अर्थपुरवठा, महाराष्ट्र राज्य पूणे यांची अधिसूचना जावक क्रमांक सी.एम.आर 12 वरोरा 70 पूणे दिनांक 15 ऑक्टोबर 1970 नूसार कृषि उत्पन्नाचे नियमन वरोरा कृषि उत्पन्न बाजार समिती करीत आहे.


बाजार क्षेञ

या बाजार समितीचे कार्यक्षेत्र वरोरा तालुक्याएवढेच मर्यादीत असून यात 179 गावे समाविष्टि आहे


मुख्य बाजार आवार (मुख्य मार्केट यार्ड)

कृषि उत्पन्न बाजार समिती वरोराचे मुख्य मार्केट यार्ड राजीव गांधी मार्केट यार्ड मोहबाळा रोड वरोरा येथे असून 16 एकर मध्ये वसलेले आहे. तसेच मुख्य कार्यालय वरोरा शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असून मुख्य कार्यालयालगत शॉपिंग कॉम्प्लेक्स ची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच जुने धान्य मार्केट वरोरा येथेही बाजार समितीची जागा असून त्या ठीकाणी अत्याधुनिक फळेभाजीपाला मार्केट करण्याचा बाजार समितीचा मानस आहे.


उपबाजार आवार

उपबाजार मार्केट यार्ड शेगाव बु., माढेळी, खांबाडा येथे सुसज्ज्‍ स्थितीत आहे. मुख्य बाजार व उपबजार येथे स्वमालकीची जमिन आहे.
उपबाजाराची स्थापना खालील तारखेस झालेली आहे.
  1. शेगाव बु. - 13/10/1975
  2. खांबाडा - 03/08/1987
  3. माढेळी - 03/08/1987